शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने खासदरा संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधिमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही. विधिमंडळामध्ये बनावट शिवसेना आहे, ते चोरांचं मंडळ आहे, अशा शब्दांत राऊतांनी टीकेचे बाण सोडले. यावेळी त्यांनी कणेरी मठातील गायींच्या मृत्यू प्रकरणी देखील सवाल उपस्थित करत पालघर साधू हत्याकांडाशी त्याची तुला केली आहे.